Hp
महाराष्ट्र

"...नाहीतर आमचा नाईलाज होईल", मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर बोलले तर आम्ही बघू, असा इशारा देखील त्यांनी भुजबळांना दिला आहे.

नवशक्ती Web Desk

सरकार मराठा आरक्षणाबाबत काय करतंय, किती गांभिर्याने घेतंय हे समजा बघतोय. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागेल याची खात्री आहे. मराठे राजकारण्यांना फिरुन दारालाही शिवू देणार नाहीत. कारण आमच्यासाठी आमच्या लेकरांचं हित महत्वाचं आहे. ज्या नेत्यांना आम्ही मोठं केलं ते जर आमच्याच विरोधात जात असतील तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

या प्रकरणावर बोलताना ते मनोज जरांगे म्हणाले की, आमचे लेकरांचं भविष्य आणि ते मोठे झाले पाहिजेत. आमच्यासाठी हे महत्वाचं आहे.आम्ही २४ डिसेंबर पर्यंत वाट पाहू त्यांना मराठा काय चिज आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला लक्षात येईल. थोडा धिर धरा. तुम्ही का पलट्या मारताय? तुम्ही विषय का घेत नाहीत.याकडे आमचंही लक्ष आहे. तुम्ही काय करताय, काय करणार यावर बारकाईने नजर आहे. तु्म्ही आम्हाला काय आश्वासन दिलीत, गुन्हे अटकेबाबत काय म्हटलं. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनावर काय करताय यावर माझ्यासह मराठा समाजाच लक्ष आहे. जरी माझा गरीब असला आणि शेतात राबत असला तरी आपण निवडून देलेत ते आपल्याबाबत अधिवेशनात काय भूमिका मांडतायेत हे बारकाईने पाहतोय. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मराठा समाज काय आहे ते पाहा, असं जरांगे-पाटील म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत मी जे काही बोललो ते खरं करुन दाखवलंय. मराठा आणि महाराष्ट्र काय हे २४ डिसेंबरनंतर कळेल. या लोकांना एवढा पश्चाताप होईल की आपण हा विषय सोडवायला हवा होता. आता मात्र खेळ विचित्र झाला. काय समजायचं ते समजा, आम्हालाही मर्यादा आहेत. आमचा संयम बघायला लागलात तर आमचा देखील नाईलाज आहे. शांततेत आंदोलन होणार यावर माझा समाज आणि मी ठाम आहे. पण, सरकारला एवढा पश्चाताप येणार आहे की जीवनात आजपर्यंत कधीही आला नसले, असं देकील मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, आज इंदापूरला ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार सभा होत आहे. त्यावर देखील जरांगे यांनी भुजबळ यांना सल्ला दिला आहे. सभा कुणीही घ्यावी, हा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु जातीवाचक काही बोलू नये. तेढ निर्माण करु नये. घटनात्मक पदावर बसून आपण कायदा पायदळी तुडवायला नको याचं भान ठेवलं पाहिजे. तसंच वयाचा देखील विचार केला पाहिजे. शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्यांना शासन-प्रशासनाचा ४५ वर्षाचा अनुभव आहे. अशा माणसाने जातीय तेढ, दंगलीच्या भाषा करु नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. जर बोलले तर आम्ही बघू, असा इशारा देखील त्यांनी भुजबळांना दिला आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक