महाराष्ट्र

Pahalgam terror attack : ...आणि आम्ही देखील ‘अल्लाह हू अकबर’ म्हटले

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जेष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी भावूक झाल्या.

Swapnil S

पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले पुण्याचे कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जेष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी भावूक झाल्या.

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. सैन्य दलाची देखील मदत झाली, पण ती उशिरा झाली, तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या. तुम्ही अजाण वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथे असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या-मोठ्या अजाण म्हटले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकले.

तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथे घोड्यावर बसून गेलो, तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ म्हणायला लागलो असे कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video