महाराष्ट्र

पंढरपूर पालखी महामार्गावर अपघातात पाच ठार

मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Swapnil S

बीड : मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातातील एका गंभीर जखमी महिलेवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ऑटोला जवळपास ५० ते ६० फूट फरफटत नेले.

माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही लोक ऑटोने रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तेलगावकडून माजलगावकडे जात होते. नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या आयशरने या ऑटोला जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात ऑटोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या गंभीर जखमी महिलेचा सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video