महाराष्ट्र

पंकजा मुंडे, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर अन्... परिषदेच्या ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांनी आज रविवारी २८ जुलै रोजी शपथ घेतली.

Suraj Sakunde

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण ११ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये १२ उमेदवार असल्यामुळं कोणता एक उमेदवार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. शेवटी निकाल हाती आल्यानंतर महायुतीच्या सर्व ९ उमेदवारांचा विजय झाला, तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एका उमेदवाराचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटानं पाठिंबा जाहीर केला होता.

दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेतील सर्व ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांनी आज रविवारी २८ जुलै रोजी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

या ११ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला-

  • पंकजा मुंडे (भाजप)

  • योगेश टिळेकर (भाजप)

  • अमित गोरखे (भाजप)

  • परिणय फुके (भाजप)

  • सदाभाऊ खोत (भाजप)

  • भावना गवळी (शिवसेना शिंदे गट)

  • कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे गट)

  • शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

  • राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

  • प्रज्ञा सातव (काँग्रेस)

  • मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे गट)

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक