महाराष्ट्र

रॅगिंगमुळे लोणावळ्यात दिव्यांग मुलीला ब्रेन स्ट्रोक झाल्याचा पालकांचा आरोप

रॅगिंगच्या आरोपातील संशयितांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यावरून संबंधित तीन मुलींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. तक्रार नोंदवूनही लोणावळा ग्रामीण पोलिस आपल्या पाल्याला न्याय देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Swapnil S

कराड : लोणावळ्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या सातारा जिल्ह्यांतील एका दिव्यांग विद्यार्थी मुलीला वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींनी केलेल्या रॅगिंगमुळे 'ब्रेन स्ट्रोक' झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या आई-वडिलांनी केला आहे. याबाबत त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. सध्या पीडित मुलीवर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.पीडित मुलगी १९ वर्षांची असून,ती मूळची राहणारी सातारा जिल्ह्यातील आहे.

लोणावळ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी त्याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात इतर तीन मुलीसोबत राहत होती. ती अपंग (दिव्यांग) आहे. त्यामुळे तिच्या अपंगत्वावरून तिन्ही मुली तिची वारंवार छेड काढत असत. दोन-तीन महिने हा प्रकार सुरू होता, अशी माहिती पालकांना समजली.त्यानंतर याबाबत पीडितेने तिच्या वडिलांना सर्व माहिती दिली.सदर माहिती मिळताच वडिलांनी मुलीच्या वसतिगृहात जाऊन यातील एका मुलीच्या पालकांना पीडितेच्या वडिलांनी बोलावले होते. यावेळी त्यांनी तुमची मुलगी माझ्या मुलीवर रॅगिंग करते, असे सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला समजाविण्याऐवजी पीडितेच्या वडिलांनाच धमकावले होते.त्यानंतरही पीडितेने रॅगिंग करणाऱ्या तीन मुलींबाबत प्राचार्यांकडे तक्रारही केली होती. मात्र,या तक्रारीची दखल घेतली न गेल्याने मानसिक तणावात जाऊन तिला ब्रेन स्ट्रोक झाल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.

रॅगिंगच्या आरोपातील संशयितांवर कडक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यावरून संबंधित तीन मुलींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. तक्रार नोंदवूनही लोणावळा ग्रामीण पोलिस आपल्या पाल्याला न्याय देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

लोणावळा ग्रामीणचे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले, संबंधित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महाविद्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती मागविण्यात आली आहे. पीडित मुलीचा जबाब महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या ती बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने अद्याप जबाब नोंदविण्यात आला नाही. मात्र पुन्हा भेट घेऊन जबाब नोंदविला जाणार आहे. जबाब नोंदविला गेल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय