महाराष्ट्र

‘भाजप जनतेची पाकीटमार’; महाराष्ट्रातील अनेक भागांत पोस्टरबाजी

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, पलटवार होत असताना भाजप जनतेची 'पाकीटमार' असे पोस्टर्स मुंबईसह राज्यातील अनेक भागांत झळकत आहेत. विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल असे संकेत मिळत असताना भाजपवर निशाणा साधत भाजप जनतेची 'पाकीटमार' असे पोस्टर झळकत असल्याने ऐन निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांची उणीधुणी काढत असताना आता भाजपविरोधात विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोस्टर वॉर सुरू झाले आहे. देशात दिवसेंदिवस महागाई आग ओकत असून महागाईच्या मुद्यावरून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पोस्टर्सच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत झळकवण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारी व्यंगचित्र आहेत. सणासुदीच्या काळात महागाई कमी करण्यात महायुती सरकार अपयशी ठरले, अशी वाक्ये पोस्टर्सवर झळकवत फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, नागपूर, हिंगोली अशा राज्यातील विविध भागांत पोस्टर लागल्याचे समजते. मात्र, हे पोस्टर्स कोणी लावले हे अद्याप समजू शकलेले नाही.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला