पोश कायद्याचे तिसऱ्यांदा उल्लंघन, तर परवानाच रद्द; सरकारी, खासगी आस्थापनांना राज्य सरकारचा इशारा 
महाराष्ट्र

पोश कायद्याचे तिसऱ्यांदा उल्लंघन, तर परवानाच रद्द; सरकारी, खासगी आस्थापनांना राज्य सरकारचा इशारा

कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास, संबंधित आस्थापना प्रमुखाला कलम-२६ नुसार ५० हजारांपर्यंत दंड तसेच, उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दंड दुपटीने वाढविणे, त्यानंतरही उल्लंघन केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द करणे किंवा अन्य कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे.

Swapnil S

मुंबई: महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी ‘प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट’ (पोश) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मात्र ‘पोश’ कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास ५० हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा पोश कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्यास १ लाखांपर्यंत दंड, तर तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने दिला आहे. तसेच पोश कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व आस्थापनांनी तातडीने समिती स्थापन करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

ज्या कार्यालये किंवा आस्थापनांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

अशी होईल दंडात्मक कारवाई

कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास, संबंधित आस्थापना प्रमुखाला कलम-२६ नुसार ५० हजारांपर्यंत दंड तसेच, उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दंड दुपटीने वाढविणे, त्यानंतरही उल्लंघन केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द करणे किंवा अन्य कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे.

...तर १८१ क्रमांकावर तक्रार करा!

नागरिक ज्या कार्यालये किंवा आस्थापनांना भेट देतील, त्या ठिकाणी अंतर्गत समितीचा फलक प्रदर्शित नसेल, तर त्याबाबत तक्रार १८१ या महिला हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहनही आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी