महाराष्ट्र

प्रतापगड किल्ल्याची पुरातत्त्व खात्याकडून दुरुस्ती

प्रतापगड हा किल्ला इतिहासाची साक्ष देणारा आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे, जो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पश्चिमेस ८ मैलावर स्थित आहे.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : प्रतापगड हा किल्ला इतिहासाची साक्ष देणारा आहे. महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे, जो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पश्चिमेस ८ मैलावर स्थित आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे आणि त्याची उंची ३५५६ फूट एवढी आहे.

प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ मध्ये मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर भवानीमातेची मूर्ती स्थापित केली, जी त्यांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून घडवून घेतली होती. किल्ल्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची घटना, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ रोजी विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखानचा पराभव केला. या लढाईने भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खन प्रदेशात एक शक्तिशाली शासक म्हणून स्थापित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांच्या मदतीने प्रतापगड किल्ला बांधला आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्याची दुरुस्ती करण्याचे काम पुरातत्त्व खात्याकडून सुरू करण्यात आले आहे. संरक्षक भिंत व बुरुज यांचा देखावा पुरातन काळाप्रमाणेच दिसावा यासाठी कोरीव दगड घडवले जात आहेत, आवश्यक तिथे सिमेंटचा लेप दिला जात आहे.

प्रतापगड किल्ल्याची उंची मोठी असल्याने मानवी वाहतूक करणे अशक्य बाब असल्याने किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी क्रेन बनवण्यात आली असून या क्रेनच्या सहाय्याने उंच अशा किल्ल्यावर दगड पोहचवले जात आहेत.किल्ल्याच्या उत्खननात धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे दगडी जाते सापडले आहे.हे लोकांन पहाण्यासाठी ठेवण्यात आले आहे.जिथे ध्वज फडकावला जातो तेथील भागात हे जाते ठेवण्यात आले आहे.सिमेंटच्या वापरामुळे किल्ला सफेद सफेद झाला आहे.खूप वर्षांनंतर प्रतापगड किल्ल्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.त्यामुळे इतिहास प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले जात आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश