प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल

मृत महिला स्थानिक जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्याच जिममध्ये काम करणारा जिम ट्रेनर सचिन मोहन जुन्नरकर (३८) याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर...

Krantee V. Kale

पुणे : बिबवेवाडी परिसरात एका ३४ वर्षीय रिसेप्शनिस्ट महिलेने पतीला सर्वांसमोर झालेल्या मारहाणीचा आणि अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मोनाली गौरव धुर्डे (३४) असे असून त्या स्थानिक जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. त्याच जिममध्ये काम करणारा जिम ट्रेनर सचिन मोहन जुन्नरकर (३८) याने मोनाली यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

२७ एप्रिल रोजी सायंकाळी सचिन जुन्नरकर, त्याची पत्नी अश्विनी आणि इतर आरोपींनी संगनमताने मोनाली यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यांनी मोनाली आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि सर्वांसमोर अपमानित केले. या घटनेनंतर २८ एप्रिल रोजी पहाटे, पती झोपेत असताना त्यांनी घरातील छताच्या हुकाला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम