प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

चाकण येथे पाशवी कृत्य, गळा चिरला; बिहारला पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक

चाकण परिसरातील खालुंब्रे येथे एका तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चाकूने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

पुणे : चाकण परिसरातील खालुंब्रे येथे एका तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चाकूने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन आरोपीला चाकण आणि दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले.

मृत मुलाची आई खालुंब्रे परिसरात मजुरीचे काम करते. शुक्रवारी दुपारी तिचा तीन वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. आईने परिसरात आणि जवळच्या नाल्यांमध्ये शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील खोल्यांची झडती घेतली असता, एका बंद खोलीत संशय आला. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, एका 'सुटकेस 'मध्ये त्या चिमुरड्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान असे समोर आले की, आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यानंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली.

आरोपी हा महिनाभरापूर्वीच बिहारहून चाकणमध्ये मजुरीसाठी आला होता. गुन्हा केल्यानंतर तो खोलीला कुलूप लावून पसार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकावर गाठले, जिथे तो बिहारला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दक्षिण म्हाळुंगे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या क्रूर कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

Badlapur : प्राजक्ता मेहेर यांची हत्या केल्याचे स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून हत्येचा उलगडा