राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव 
महाराष्ट्र

Pune : पदवीधर मतदारसंघात जाधव विरुद्ध जाधव; शिक्षक मतदारसंघात तिरंगी सामना

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात थेट लढत होणार आहे.

Swapnil S

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील राजकीय लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असून, शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराच्या सहभागामुळे तिरंगी सामना रंगणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने पक्षांतर्गत बंडखोरी शमल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन प्रमुख महिला उमेदवारांमधील लढतीकडे लक्ष लागले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यात सामना होणार आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही असलेल्या सानप यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप कोणाच्या मतांवर प्रभाव टाकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चिवटेंना योग्य न्याय देणार

शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांनी अर्ज मागे घेतले. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर चिवटे यांनी माघार घेतली. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी चिवटे यांनी पक्षाच्या निर्णयाचा आदर करून माघार घेतल्याचे सांगितले. तसेच, त्यांना योग्य न्याय देण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक