पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव मर्सिडिझने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू छायाचित्र सौ. - FPJ
महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव मर्सिडिझने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजजवळ एका भरधाव वेगात जाणाऱ्या मर्सिडिझ कारने दुचाकीस्वाराला उडवले असून त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजजवळ एका भरधाव वेगात जाणाऱ्या मर्सिडिझ कारने दुचाकीस्वाराला उडवले असून त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे.

शुभम भोसले आणि त्याचे मित्र निखिल रानडे, श्रेयस सोळंखी आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत या चौघांनी हिंजवडी परिसरात मद्यसेवन केले. त्यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरून कात्रजच्या बोगद्याच्या दिशेने जात असताना शुभम भोसले याने नशेतच दुचाकीला धडक दिली. त्यात कुणाल हुशार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र प्रज्योत पुजारी हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारमधील मद्यधुंद चालकासह चार तरुणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली नाही. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप अपघातात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video