विशाल अग्रवालला दणका 
महाराष्ट्र

Pune Killer Porsche : विशाल अग्रवालला दणका, कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी

‘आपला मुलगा अल्पवयीन आहे, त्याच्याकडे गाडी चालवायचे लायसन्सही नाही, तरीही त्यांनी मुलाला गाडी चालवायला का दिली? ....

Suraj Sakunde

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान विशाल अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टानं त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशाल अग्रवालला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यानंतर सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला. तपासासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली, परंतू कोर्टाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.

सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद-

‘आपला मुलगा अल्पवयीन आहे, त्याच्याकडे गाडी चालवायचे लायसन्सही नाही, तरीही त्यांनी मुलाला गाडी चालवायला का दिली? पबमध्ये जाण्यासाठी संमती का दिली? याचा तपास करायचा आहे. या कारची नोंदणी का केलेली नाही? फरार असताना आपले मोबाइल लपवले, ते हस्तगत करायचे आहेत," असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

अटक केलेल्यांमध्ये चालक चत्रभूज डोळस, राकेश पौडवाल, अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटरवरील जयेश बोनकर यांचा समावेश आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजार करण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नमन भुतडा, जयेश बोनकर व विशाल अगरवाल यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नमन प्रल्हाद भुतडा (वय २५), सचिन काटकर (३५), संदीप सांगळे (३५) यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयाने आरोपींना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी