प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

पुणे : मागच्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याने सहकाऱ्याचा गळा चिरून केला खून; खासगी क्लासेसमधील थरकाप उडवणारी घटना

वाडा रस्त्यावरील नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ संस्कार कोचिंग क्लास वर्ग भरतात. सोमवारी शिक्षिका मुला-मुलींचा क्लास घेत असताना मागच्या बेंचवर बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याने...

Krantee V. Kale

पुणे : येथील एका खासगी क्लासच्या दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्याच क्लासच्या मुलाचा गळा कापून खून केला. मयत मुलाचे नाव पुष्कर शिंगाडे (वय १६) आहे. शिकवणी सुरू असताना वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतच ही धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

वाडा रस्त्यावरील नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ संस्कार कोचिंग क्लास वर्ग भरतात. सोमवारी शिक्षिका मुला-मुलींचा क्लास घेत असताना मागच्या बेंचवर बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याने पुष्करच्या पोटावर, गळ्यावर चाकूसा‌रख्या धारदार हत्याराने वार केले. त्याच अवस्थेत शिक्षिका आणि शेजाऱ्याने पुष्करला दवाखान्यात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

जुन्या भांडणाचा राग

पुष्करचा गळा चिरल्यानंतर आरोपी विद्यार्थी पोलीस चौकीत हजर झाला. मयत आणि आरोपी यांच्यात यापूर्वी जुन्या भांडणाचा राग होता. त्यावरूनच त्याने त्याचा खून केला. पुष्कर हा राजगुरूनगर येथे तर आरोपी प्रयाग हा मांजरेवाडीतील शाळेत शिकत होता आणि वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. क्लासच्या शिक्षिका जयश्री गणेश साबळे यांनी फिर्याद दिल्यानंतर अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?