महाराष्ट्र

Pune : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सामूहिक अत्याचार

फेसबुकवर ओळख झालेल्या कांदीवली येथील एका तरुणाने ३३ वर्षीय महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून भेटण्यास आल्यानंतर कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध दिले.

Swapnil S

पुणे : फेसबुकवर ओळख झालेल्या कांदीवली येथील एका तरुणाने ३३ वर्षीय महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून भेटण्यास आल्यानंतर कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर आरोपी व त्याच्या तीन मित्रांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींवर काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर आरोपी यांनी पीडित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून धमकी देत दहा लाख रुपये रोख स्वरूपात आरोपींनी घेतले. त्यानंतर महिलेच्या नावावर वेगवेगळ्या बँकेत तब्बल १८ लाख रुपयांचे कर्ज काढून आरोपींनी त्या महिलेकडे अधिक पैशाची मागणी केली.

महिलेने सुरुवातीला घेतलेल्या पैशाची मागणी आरोपींकडे केली असता त्यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

Karjat : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी; मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कलाकार मग्न

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी