Satara : कोयना धरणात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचे आगमन 
महाराष्ट्र

Satara : कोयना धरणात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाचे आगमन

पाटण तालुक्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील सातारा, पाटण, कराड, जावळी व महाबळेश्वर तालुक्यातही सध्या दमदार पाऊस पडत आहे.

Swapnil S

कराड : पाटण तालुक्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील सातारा, पाटण, कराड, जावळी व महाबळेश्वर तालुक्यातही सध्या दमदार पाऊस पडत आहे. कोयना धरणांतर्गत विभागात कोयना, महाबळेश्वर या ठिकाणी अपेक्षित पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व पाणीसाठ्यातही वाढ सुरू असून धरणात सरासरी २३७७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास निश्चितच समाधानकारक सुरुवात झाली आहे.

चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह जिल्ह्यातील पश्चिमेकडील सातारा, पाटण, कराड, जावळी व महाबळेश्वर तालुक्यातही अपेक्षित पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जलसाठ्यात सुधारणा होणार

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत २८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे धरण क्षेत्रात पर्जन्यमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जलसाठ्यातही हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन