महाराष्ट्र

राज ठाकरे व नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर एकत्र सभा? अमित ठाकरे यांनी दिली माहिती

Swapnil S

पुणे : महायुतीच्या उमेदवारांसाठी स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर समारोपाची एकत्रित सभा होण्याची शक्यता असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी दिली.

पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेची रणनीती कशी असावी आणि मनसेचा कसा सहभाग असेल, याबाबत सविस्तर चर्चा त्यांनी केली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. भाजपला ३०० च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास