महाराष्ट्र

...आणि कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी घरीच बोलावून घेतले

राज ठाकरे यांनी आज काही चिमुकल्यांसाठी आपला महत्वपूर्ण वेळ राखून ठेवला होता

नवशक्ती Web Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी त्यांच्या आक्रमक आणि कणखर स्वभासाठी ओळखले जातात. मात्र आज सर्वांना त्यांच्यातला हळवा कोपरा पाहायला मिळाला आहे. नेहमीच राजकीय नेते, दिग्गज कलाकार, उद्योजक आणि वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज काही चिमुकल्यांसाठी आपला महत्वपूर्ण वेळ राखून ठेवला होता. या चिमूकल्यांसोबत मनसोक्त गप्पा करत राज यांनी आनंदीत क्षण व्यतीत केले.

मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना मला भेटायचं असल्याचं मला सांगण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांना मी घरीच बोलावून घेतलं. या मुलांना भेटून खरंच छान वाटलं. असं राज यांनी या मुलांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच निसर्गाकडून त्यांना ऐकण्याची क्षमता मिळाली नसली तरी त्यांची निरागसता आणि उत्साह शब्दश: कमाल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी एका लहान मुलीने हातवारे करुन राज यांना कविता म्हणून दाखवली. या तसेच देशातील कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात कोणत्याच अडणची नको येऊ देत आणि समाज त्यांना स्वीकारतो आहेच. पण त्यांच्या गरजांविषयी आपण सगळे अधिकच सजग होऊया अशी इच्छा राज यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. त्यांनी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचं वर्णन केलं आहे.

राज ठाकरे हे कलाकार तसंच कलाप्रेमी आहेत. कलाकार हा हळव्या मनाचा असतो. पण राज यांचं व्यक्तीमत्व मात्र आक्रमक आणि परखड पाहायला मिळतं. मात्र, आज राज यांच्यातल्या हळव्या माणसाचं सर्वांना दर्शन झालं आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल