महाराष्ट्र

राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; 'या' विषयांवर झाली चर्चा

Swapnil S

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी भेट घेतली. याभेटीत मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर, मुंबईत सुरु असेलेली विविध विकासकामे आणि कल्याण डोंबिवलीतील विकासकामांसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

एका वर्षात घेतलेल्या भेटीगाठी -

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यावर्षी अनेकदा भेटी झाल्या. 27 मार्च रोजी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या शिवाजी पार्कवरील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2023 राज ठाकरेंच्या नेतृत्वात विविध शिष्टमंडळांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्याची भेट घेतली होती. 7 जुलै 2023 शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज यांची भेट घेतली. यानंतर 2 आणि आज 28 डिसेंबर रोजी भेट घेतली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त