ANI
महाराष्ट्र

Raj Thackeray : "...नाहीतर टोलनाके जाळून टाकू", राज ठाकरेंचा टोलप्रश्नी पुन्हा एल्गार

नवशक्ती Web Desk

राज्यातील टोल प्रश्नावरुन राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राज यांनी पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ' चा नाद छेडला आहे. यात त्यांनी अजित पवार, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांना देखील सोडलेले नाही. टोलच्या पैशाचं काय होतं? त्याचं कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील टोलनाक्यांवरुन पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. राज्यातील टोलवसुली प्रश्नी पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने टोल आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा आणि भाजपचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांनी टोल माफी देण्याचे केलेलं भाषण दाखवलं. यावेळी राज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची देखील दोन भाषणं दाखवली.

या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलमाफी देण्यात आलीअसून फक्त मोठ्या कमर्शिअल गाड्यांनाच टोल आकारला जात आहे, असं सांगितलं. हे खरं आहे का? तुम्हाला कार घेऊन जाताना टोल भरावा लागत नाही का? फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कार, रिक्षा, टुव्हीलरना टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून हा टोल आकारु देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोल नाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तुम्ही माघार का घेतली? आताच्या सरकारवर दबाव आहे का? कोणाच्या उत्पन्नाचे साधन आहे का? पुढील दोन तीन दिवसात मला यांची उत्तरे मिळतील. राज्या सरकारने हे पैसे घेतले का? जर ते घेतले असतील तर लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला