महाराष्ट्र

साताऱ्यातील राजेवाडी तलाव 'ओव्हर फ्लो'; ६ दिवसांपासून परिसरात जोरदार पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग ५ ते ६ दिवसांपासून वरुण राजा जोरदार बरसला. गत ५ दिवसांपासून माण तालुक्यात संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. माण तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढल्याने व माण गंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसामुळे ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

Swapnil S

कराड : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग ५ ते ६ दिवसांपासून वरुण राजा जोरदार बरसला. गत ५ दिवसांपासून माण तालुक्यात संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. माण तालुक्याच्या पश्चिमेस पावसाचा जोर वाढल्याने व माण गंगा परिसरात सततच्या पावसाने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसामुळे ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

यंदा उन्हाळी आवर्तनाचे जिहे-कठापूर योजनेचे पाणी माणगंगा नदीत सोडले होते. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस तलाव सिंचन क्षेत्रात जोरदार बरसला. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला या तलावात १० फूट पाणी पातळी होती. हा तलाव पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी २५ फूट पाणीसाठा होणे गरजेचे असते. माणगंगा दुथडी भरून वाहिल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video