महाराष्ट्र

पंजाबमधील राज्यसभेच्या पाचही जागांवर ‘आप’ची छाप

वृत्तसंस्था

पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा विजयी पताका फडकावली आहे. राज्यसभेच्या पाचही जागांवर आपचे पाचही उमेदवार बिनविरोध निवडून जाणार हे गुरुवारी स्पष्ट झाले आहे. आपने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्यासह राघव चड्ढा, संदीप पाठक, संजीव अरोरा आणि अशोक मित्तल यांना राज्यसभेसाठी संधी दिली आहे.

पंजाबमधून राज्यसभेवर निवडून द्यायच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. या जागांसाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होणार होती. मात्र, या पाच जागांसाठी आप वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने आपचे पाचही उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याची अधिकृत घोषणा आता ३१ मार्च रोजी होणार आहे.

हरभजनच्या राजकारणातील

इनिंगला होणार सुरुवात

आपच्या यादीतील हरभजन सिंग हे नाव सर्वात लक्षवेधी ठरले आहे. आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर क्रिकेटचे मैदान गाजवणारा हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता राजकीय पिचवर आपली नवी इनिंग खेळताना दिसणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री