महाराष्ट्र

Rashmi Shukla: राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला! भाजप नेत्याचं ट्विट आणि...

रश्मी शुक्ला या महाविकास आघाडी सरकारच्या फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आल्या होत्या.

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एक्सवर पोस्ट करत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. "महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.!!" असं मुनगंटीवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज्याचे मंत्री सुधीन मुनगंटीवार यांनी याबाबत एक्सवर पोस्टकरत माहिती दिली असली तरी अधिकृत रित्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे राज्याला पहिल्या महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या.

रजशीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या(MPSC)अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. रश्मी शुक्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या असल्याचं बोललं जातं. त्यांची फोन टॅपिंग प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे.

रश्मी शुक्ला या सध्या सीआरपीएफमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. अद्याप त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आलेला नसल्याचं बोललं जात आहे. आज दिवसभरात त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी त्या राज्यात परतणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कॅबिनेमटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर पोस्ट केल्याने रश्मी शुक्ला यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. दरम्यन, काही वेळाने सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळाने आपली पोस्ट डिलीट केली आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा