महाराष्ट्र

लालचुटुक स्ट्रॉबेरीच्या जोडीला आता रासबेरी अन् गुजबेरी; महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना दुहेरी आनंद

शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप/कराड

शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. महाबळेश्वरचे थंड वातावरण, इथली माती स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे. त्यामुळे प्रथम ब्रिटिशांनी इथल्या मातीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. पुढे जाऊन हेच फळ तालुक्याचे मुख्य पीक बनले अन् महाबळेश्वरला ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी भौगोलिक ओळखही मिळाली. महाबळेश्वरसारख्या पर्यटन-स्थळाबरोबरच 'स्ट्रॉबेरी लँड' अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.

दहा वर्षांत स्ट्रॉबेरीच्या विविध जाती विकसित झाल्याने शेतकऱ्यांकडून काही जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली. प्रयोग यशस्वी झाल्याने आता विविध १४ प्रकारच्या स्ट्रॉबेरीची शेतकरी लागवड करू लागले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात २० टक्के विंटर डाऊन तर ८० टक्के अन्य जातीच्या रोपांची लागवड केली जाते. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून शेतकऱ्यांना अर्थबळ प्राप्त करून देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाबरोबरच काही शेतकरी रासबेरी, गुजबेरीची लागवड करून उत्पादन घेऊ लागले आहेत.रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे.

महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र हळूहळू वाढू लागले आहे. यंदा २ हजार ३०० शेतकऱ्यांकडून २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे.

रासबेरीला पर्यटकांची अधिक मागणी

स्ट्रॉबेरीच्या तुलनेत रायबेरी या फळांचे उत्पादन अत्यल्प असते रासबेरी हे गुलाब कुटुंबातील एक फळ आहे. हे फळ लाल, काळे, पिवळे किंवा जांभळ्या रंगाचे असते. तसेच गुजबेरी हे फळ पिवळ्या रंगाचे असून, आकार गोलाकार असतो. याची चव आंबट-गोड असते. या फळांचा दर अधिक असला तरी पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन