महाराष्ट्र

Uddhav Thackeray : कथित १९ बंगले घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

रायगडमधील कोर्लईतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून यामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अडचणी वाढणार का? असा सवाल उपस्थित होतो

प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कथित १९ बंगल्यांचे घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप करत हे प्रकरण पुन्हा उकरून काढले होते. यासंदर्भात आता आणखी एक बातमी समोर आली आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.

संबंधित तक्रारीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे ग्वाही पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी करण्यात येणार असून हे मुळ १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? तसेच, याचा ठाकरे कुटुंबाशी काही संबंध आहे का? याचादेखील तपास करण्यात येईल. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळे आता उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढू होऊ शकते, अशी चर्चा आहे.

हेही वाचा :

रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांच्या प्रकरणावर किरीट सोमय्यांनी उचलले हे पाऊल

भाजप नेते किरीट सोमय्यांनी रायगडमधील कोर्लई गावात उद्धव ठाकरेंची संपत्ती असल्याचा दावा केला होता. त्यांनी कोर्लईमधील कथित १९ बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, तसेच मध्ये गटविकास अधिकाऱ्यावर रेवदंडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे