Pune : बारामती विमानतळाजवळ अपघात; रेडबर्ड एव्हिएशनचे शिकाऊ विमान कोसळले, पायलट सुरक्षित (संग्रहित छायाचित्र -FPJ)
महाराष्ट्र

Pune : बारामती विमानतळाजवळ अपघात; रेडबर्ड एव्हिएशनचे शिकाऊ विमान कोसळले, पायलट सुरक्षित

पुढील तपास आणि मूल्यांकनानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे अकॅडमीकडून सांगण्यात आले.

किशोरी घायवट-उबाळे

पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ बुधवारी (दि.१३) सकाळी रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे प्रशिक्षण विमान कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेडबर्ड एव्हिएशनच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटनेनंतर जारी केलेल्या निवेदनात रेडबर्ड एव्हिएशनने सांगितले की, त्यांच्या VT-RFY नोंदणी क्रमांक असलेल्या टेक्नॅम P2008JC या विमानाचा बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गाव परिसरात सोलो प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात झाला.

वैमानिक सुरक्षित, कोणतीही दुखापत नाही

कंपनीने स्पष्ट केले की, विमानात असलेला प्रशिक्षणार्थी वैमानिक (Pilot) सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. "परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे," असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून आवश्यक कारवाई केली जात असल्याची माहितीही देण्यात आली. पुढील तपास आणि मूल्यांकनानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे अकॅडमीकडून सांगण्यात आले.

तांत्रिक बिघाड होऊन अपघात

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ८.५० वाजता विमानतळालगत असलेल्या गोजुबावी गावाजवळ घडली.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमान कमी उंचीवर उड्डाण करत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला.

आपत्कालीन लँडिंगदरम्यान विजेच्या खांबाला धडक

पोलिसांनी सांगितले की, आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करताना विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला. यानंतर विमान जमिनीवर कोसळले. घटनेच्या वेळी विमानात केवळ प्रशिक्षणार्थी वैमानिक उपस्थित होता. या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.

रेडबर्ड एव्हिएशनच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

बुधवारच्या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी गेल्या काही वर्षांत रेडबर्ड एव्हिएशनशी संबंधित वारंवार होणारे अपघात आणि आपत्कालीन लँडिंगच्या घटनांमुळे अकॅडमीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट