महाराष्ट्र

पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टीची आवश्यकता; जेट्टीअभावी महिला, ज्येष्ठ नागरिक घेतात छोट्या बोटीची मदत

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टीची सुविधा नसल्याने पर्यटक वाहतूक सेवा संस्थेला अपेक्षित पर्यटकांची ने -आण करता येत नाही.

Swapnil S

संजय करडे/मुरुड जंजिरा

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टीची सुविधा नसल्याने पर्यटक वाहतूक सेवा संस्थेला अपेक्षित पर्यटकांची ने -आण करता येत नाही. किल्ल्यात उतरताना जेट्टी अभावी महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना छोट्या बोटीची मदत घ्यावी लागते. पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टी उभारावी अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

जंजिरा आणि पद्मदुर्ग ( कासा ) हे दोन्ही किल्ले पुरातत्व खात्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ठेवा आहे. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी व खोराबंदर येथून इंजिनच्या तसेच शिडाच्या होड्या उपलब्ध आहेत. तशी व्यवस्था मार्च २०२४ पासून मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी असलेल्या माऊली कृपा पर्यटक जल वाहतूक सेवा सहकारी संस्थेला तसेच अन्य ठेकेदारांना दिली असून खोराबंदर ते पद्मदुर्ग किल्ला ही प्रवासी वाहतूक सेवा कार्यरत आहे. मात्र जेट्टी नसल्यामुळे होडीसोबत छोटी होडी देखील न्यावी लागते. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी ४ ते ५ लाख पर्यटक देश विदेशातून येतात. पद्मदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे. असे असले तरी जेट्टीची व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचा फटका पर्यटनाला बसत असल्याचे स्थानिकांसह पर्यटकांकडून सांगण्यात येते.

पद्मदुर्ग किल्ल्यावर जेट्टी तसेच अन्य संवर्धन बाबींकरिता अंदाजपत्रकाप्रमाणे निधीही उपलब्ध आहे. परंतु पुरातत्व विभागाकडे ३ वर्षांहून अधिक काळापासून परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू असूनही परवानगी मिळालेली नाही.

- डी .बी पवार, उपअभियंता, मेरीटाईम बोर्ड

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video