संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

बच्चा बडा हो गया! बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Swapnil S

'रोहित पवार बच्चा आहे. मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा नाही' अशी टीका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली होती. आज (दि.४) झालेल्या मतमोजणीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दणदणीत विजय मिळवल्यावर रोहित पवारांनी काका अजित पवारांवर बोचरी टीका करत 'बच्चा बडा हो गया!' असे म्हटले आहे.

"बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआच्या सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकत्यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे", असे रोहित पवारांनी सांगितले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून पोस्टच्या सुरूवातीलाच 'बच्चा बडा हो गया!' असा टोला त्यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला.

वाचा रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी -

#बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!

बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #मविआ चे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.

या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!

दरम्यान, पवार विरुद्ध पवार असा सामना झाल्यामुळे यंदा बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. सुप्रिया सुळेंच्या दणदणीत विजयामुळे अखेरीस बारामतीचे खरे बॉस शरद पवारच असल्याचं सिद्ध झालं.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस