महाराष्ट्र

साधुग्रामसाठी साधूंना हवीय हजार एकर जागा; प्रशासन पाचशे एकर देण्यास तयार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने साधू-महंतांसाठी पाचशे एकर जागा देण्याची तयारी केली असताना साधू-महंतांनी एक हजार एकर जागा द्यावी अशी मागणी केली आहे.

Swapnil S

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने साधू-महंतांसाठी पाचशे एकर जागा देण्याची तयारी केली असताना साधू-महंतांनी एक हजार एकर जागा द्यावी अशी मागणी केली आहे. या नव्या मागणीमुळे प्रशासनासमोर काहीसा पेच निर्माण होण्याची शक्यता उभी राहिली आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभ प्राधिकरण आयुक्त करिष्मा नायर यांनी बुधवारी साधू-महंतांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर, श्री दिगंबर अनी आखाडा, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, तपोवनातील कपिला संगम यांसह विविध आखाड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असल्याने विकासकामांना गती देण्यात आली आहे. साधू-महंतांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि मागण्या समजून घेण्यात येत आहेत. सध्या प्रशासन या वाढीव भूसंपादनासाठी काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जागेचे स्वरूप आणि नियोजित विकाससध्या महापालिका ३५० एकर जागेवर साधुग्राम उभारण्यासाठी नियोजन करत आहे. यापैकी सुमारे ७०० एकर जमीन भाडेतत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित केली जाणार आहे, तर उर्वरित जमीन कायमस्वरूपी संपादनाद्वारे दिली जाईल. या योजनेत सुमारे ४ लाख साधू-महंतांच्या निवासाची आणि त्यांच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार

साधू-महंतांसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी हमी प्रशासनाने दिली आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी तपोवन परिसरात नेमून साधू-महंतांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत. कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित होईल, असे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.

कायमस्वरूपी पोलीस चौकी

चर्चेदरम्यान साधू-महंतांनी प्रशासनाने पाचशे एकर जागा देण्यास तयार असतानाही एक हजार एकर जागा संपादित करण्याची मागणी केली. तसेच, तपोवन परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल