संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

समाजवादी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार! ‘मविआ’कडे १० ते १२ जागांची मागणी करणार

Swapnil S

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या ३७ खासदारांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. सपाचे नेते अखिलेश यादव महाविकास आघाडीकडे विधानसभेच्या १० ते १२ जागांची मागणी करणार असून राज्यात सपाच्या सहकार्याविना सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावाही या खासदारांनी केला.

उत्तर प्रदेशातील सपाच्या ३७ खासदारांचा शुक्रवारी 'रंगशारदा' येथे महाराष्ट्र सपाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी या खासदारांचे स्वागत केले. उत्तर प्रदेशातून हे नेते येथे आल्याने राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. या खासदारांनी सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क येथील शिवरायांचा पुतळा, माहीम दर्गा आणि चैत्यभूमीला भेट दिली.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था