संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Swapnil S

सांगली : हिंदू जमात ही महामूर्ख असून त्यांना आपला व परक्याचा भेद कळत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

घटस्थापनेदिवशी पहाटे सांगली शहरातून भिडे यांनी दुर्गामाता दौड काढली. दुर्गामाता मंदिरात दौड आल्यानंतर ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र व आरती म्हणण्यात आली. त्यानंतर संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. परका कोण, वैरी कोण अन् कैवारी कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख आहे, असे ते यावेळी म्हणाले.

गणपती उत्सव व नवरात्रौत्सवाचा बट्ट्याबोळ केला जात आहे. गणपती उत्सवाचा आता चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत. नवरात्रौत्सवात दांडिया खेळला जात आहे. हा दांडिया हिंदू समाजाला चुकीच्या दिशेला घेऊन जात आहे. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. आम्हाला या गोष्टी मान्य नाहीत. त्या बंद पाडल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असेही ते म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस