महाराष्ट्र

संभाजी राजे छत्रपती यांची भुजबळांवर टिका ; म्हणाले, "छगन भुजबळ हे सामाजिक स्वास्थ्य..."

आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या जरांगे-पाटील आणि ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत.

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेतून आरक्षण द्यावं. असी मागणी करत मनोज जरांगे-पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. ओबीसींना दिलेलं अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला मिळावं, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या मुद्यावरुन सध्या जरांगे पाटील आणि ओबीसी नेते आमने सामने आले आहेत.

दरम्यान, आज जालन्यातील अंबड येथे मोठी सभा घेऊने सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असा इशारा सरकारला दिला. यावेळी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावरुन आक्रमक भूमिका घेतली. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही घणाघाती टीका केली. असं असताना या वादात आता संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. छगन भुजबळ हे राज्याचे सामजित स्वास्थ बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

संभाजी राजे छत्रपती फेसबूकवर पोस्ट करत म्हणाले की, छगन भुजबळ हे राज्याचे सामजित स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपलं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊने जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पस्ट करावं अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरुन हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली