(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

राज्यघटना संपविण्यासाठी संघ, भाजप अहोरात्र कार्यरत; राहुल गांधी यांचा आरोप

Maharashtra assembly elections 2024 : राज्यघटना संपविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहोरात्र कार्यरत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला.

Swapnil S

गोंदिया : राज्यघटना संपविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहोरात्र कार्यरत असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला.

शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात, पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते. भाजपचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील मूठभर उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? असा सवाल करत मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानींच्या लग्नात गेले पण मी गेलो नाही. कारण मी तुमचा आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची गोंदियात जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, उमेदवार गोपाल अग्रवाल, दिलीप बनसोड, राजकुमार पुराम, रवी बोपचे, खुशाल बोपचे आदी उपस्थित होते.

घटनेच्या रक्षणासाठीच काँग्रेसचा लढा

भाजप, आरएसएस व नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशाच्या संविधानात हजारो वर्षांपासूनचे विचार आहेत. भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. संतांचे विचार आहेत. या संविधान समानता, प्रेम, सर्वधर्माचा आदर आहे पण हे लाल रंगाचे संविधान दाखवले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, गरीब, शेतकरी यांच्यावर अन्याय, अत्याचार करावे, असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान मोदींनी देशाचे हे संविधान वाचलेच नाही. भाजप, आरएसएस व नरेंद्र मोदी २४ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर हल्ले करून ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेस मात्र या संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे.

ओबीसींवर केवळ ५ टक्के खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी असल्याचे सांगत असतात आणि त्याच ओबीसींचा सातत्याने अपमान करतात. ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्के असताना मोदी सरकार त्यांच्यावर फक्त ५ टक्के खर्च करते, हा खरा ओबीसी समाजाचा अपमान आहे. म्हणूनच जातनिहाय जनगणना करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. तसेच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवण्याचा प्रयत्न आहे, असेही गांधी म्हणाले.

...तर मोदींनी घटनेचा आदर केला असता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना वाचलेलीच नाही अशी आपण गॅरंटी देतो. त्यांनी घटना वाचलेली असती तर त्यामध्ये काय लिहिले आहे याचा त्यांनी आदर केला असता, असेही राहुल गांधी गोंदियातील एका जाहीर प्रचारसभेत म्हणाले. गेल्या १० वर्षांत तुम्ही किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे जनतेने मोदी यांना विचारावे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य मोबदला मिळेल, अशी ग्वाहीही राहुल गांधी यांनी दिली.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत