महाराष्ट्र

"आदित्य ठाकरेंच्या कपाळावरही लिहिलंय, मेरा बाप...", प्रियांका चतुर्वेदींच्या 'त्या' वक्तव्यावर संजय निरुपम यांचे प्रत्युत्तर

उत्तर पूर्व-मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. संजय दिना पाटील यांच्या घाटकोपर येथील प्रचारसभेत प्रियांका चतुर्वेदींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.

Aprna Gotpagar

मुंबई : "श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर 'मेरा बाप गद्दार है' लिहिले आहे", असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी एका सभेत केले होते. त्यावर आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलंय. "जर त्यांना (प्रियांका चतुर्वेदी) आपल्या वक्तव्यावर शब्दशः विश्वास असेल तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महा गद्दार हैं असे लिहायला हवे" अशा आशयाची पोस्ट निरुपम यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, भाजपसोबत युती तोडल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या कपाळावरही 'मेरे पिता महागद्दार' असे लिहिले पाहिजे, असे म्हणत निरुपम यांनी प्रियांकाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

निरुपम नेमकं काय म्हणाले?

निरुपम म्हणाले, "शिवसेना उबाठा गटाच्या महिला खासदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्या म्हणाल्या, श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार हैं लिहिले आहे, जर त्यांना (प्रियांका चतुर्वेदी) आपल्या वक्तव्यावर शब्दशः विश्वास असेल तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महा गद्दार हैं असे लिहायला हवे. कारण, गद्दारी तर, त्यांच्या वडिलांनी भाजपसोबत युती तोडून केली. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन आणि ज्या काँग्रेसचे ते (बाळासाहेब) आजन्म विरोधक होते, त्यांच्यासोबत हात मिळवणी करत त्यांच्या (आदित्यच्या) वडिलांनी महागद्दारी केली, असे प्रत्युत्तर निरुपम यांनी दिले आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियांका चतुर्वेदी?

उत्तर पूर्व-मुंबई मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या प्रचारासाठी घाटकोपरमध्ये बुधवारी (९ मे) महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. "गद्दार गद्दारच राहणार. एक सिनेमा आला होता, तुमच्या लक्षात असेल 'दिवार' नावाचा सिनेमा होता. या सिनेमात अमिताभ बच्चन आपला हात दाखवतात, त्या हातावर 'मेरा बाप चोर हैं' असे लिहिले असते. तसंच वाक्य श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिले आहे की, 'मेरा बाप गद्दार हैं", असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. सध्या प्रियांका चतुर्वेदींचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाषणादरम्यान प्रियांका यांनी ‘एकनाथ शिंदे गद्दार हैं’ अशा घोषणाही दिल्या. शिवाय, आपल्या या घोषणा ठाण्यापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असेही त्या उपस्थितांना उद्देशून म्हणाल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी