X
महाराष्ट्र

संजय पांडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Swapnil S

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. महाआघाडी सरकारच्या काळात पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आपण पक्षात प्रवेश करीत नसून काँग्रेस नावाच्या कुटुंबात प्रवेश करीत आहेत, असे पांडे यावेळी म्हणाले. आपल्याला २००४ सालात काँग्रेसमध्ये जायचे होते परंतु ते जमले नाही. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालतो, असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.

२०२२ आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने पांडे यांना अटक केली होती. त्यांना नंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे