मते विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेत अपहार - संजय राऊत 
महाराष्ट्र

मते विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेत अपहार - संजय राऊत

निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेत ९२ लाख बोगस लाभार्थ्यांना पैसे वाटून तब्बल ३ हजार ५१५ कोटी रुपयांचा सरकारी निधी लुटला गेला, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला.

Swapnil S

मुंबई : निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेत ९२ लाख बोगस लाभार्थ्यांना पैसे वाटून तब्बल ३ हजार ५१५ कोटी रुपयांचा सरकारी निधी लुटला गेला, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केला.

“या शतकातील हा सर्वात मोठा आर्थिक अपहार असून तत्कालीन शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळावर गुन्हे दाखल करून संबंधितांची संपत्ती जप्त करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

“लाडकी बहीण योजनेत कोणतीही योग्य पडताळणी न करता लाखो लाभार्थ्यांना पैसे वितरित करण्यात आले. त्यात ९२ लाख बोगस लाभार्थी, २९ हजार पुरुष आणि सुमारे ४ हजार ५०० सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला. या माध्यमातून सुमारे ३ हजार ५१५ कोटी रुपयांचा सरकारी निधी मतांसाठी वापरण्यात आला. हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून सरकारी तिजोरीवरील दरोडा आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळासह वित्त तसेच महिला आणि बालविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

याप्रकरणी सरकारला कायदेशीर नोटीस देण्यात येणार असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याचा इशारा देताना, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, विद्यार्थ्यांसाठी निधी नाही. मात्र हजारो कोटी रुपये मतांसाठी उधळले गेले. हा पैसा जनतेचा आहे, असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

Mumbai : मिथेनचा 'निरी'कडून अभ्यास; कांजूर डम्पिंगवरील हवेच्या गुणवत्तेवर नजर, दुर्गंधी, प्रदूषण, आगीच्या हॉटस्पॉटचा शोध घेणार

सुभाष चंद्रा यांच्यावर CBI चा गुन्हा दाखल