महाराष्ट्र

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का? ; संजय राऊत यांची टीका

प्रतिनिधी

आज शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तर, दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले हे अनुपस्थित होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, शिवप्रताप दिनानिमित्त राज्यात जल्लोष नेहमीच होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धिक्कार केला असता तर त्यांच्या अभिवादनाचे महत्त्व नक्कीच वाढले असते.

खासदार संजय राऊत हे पुढे म्हणाले की, "राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर गप्प आहेत. त्यामुळे अजूनही राज्यपाल कोश्यारी हे राजभवनात बसलेले आहेत. एव्हढंच नव्हे, तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द काढलेला नाही. याउलट भाजप सरकार त्यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आज गडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा त्यांना अधिकार आहे का?, हा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. आज प्रतापगडावर जाऊन ते ढोंग करत आहेत." अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?