ANI
महाराष्ट्र

संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मंत्रिपद न नियुक्ती मिळाल्याने नाराज असलेले आमदार संजय शिरसाट यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी नाराजी दूर करत त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

Swapnil S

आगामी विधानसभा निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिपद न नियुक्ती मिळाल्याने नाराज असलेले आमदार संजय शिरसाट यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी नाराजी दूर करत त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी बोळवण करत शिंदेंनी ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत वेगळी

चूल मांडल्यानंतर त्यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. शिंदे सूरतला गेले, त्या वेळेपासून आमदार संजय शिरसाट एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने उभे आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यावेळी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा असताना त्यांना शांत करण्यात आले. त्यानंतर शिरसाट यांनी अनेक वेळा नाराजी उघड केली. अखेर शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील आर्टिकल २०२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून संजय शिरसाट यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदावर (मंत्रिपदाचा दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे. दरम्यान, सरकारने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीही राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट नाकारलेले माजी खासदार हेमंत पाटील यांचेही एकनाथ शिंदे यांनी पुनर्वसन केले आहे. हेमंत पाटील यांची वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी निवड केली असून त्यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या सेवासुविधांवरील खर्च संबंधित केंद्राच्या कार्यालयीन खर्चातून भागवण्यात येणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, - दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. "नियुक्तीवर आनंद असला तरी माझे राजकीय पुनर्वसन होण्याचे बाकी आहे. विधानसभेला शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे ते म्हणालेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी