संतोष देशमुख संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांचा दावा पोलिसांनी फेटाळला

बीड जिल्ह्यातील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले असतानाही, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे.

Swapnil S

नाशिक : बीड जिल्ह्यातील मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले असतानाही, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे. मात्र आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार कृष्णा आंधळे याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण दिवसभर पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र, यामध्ये कुठलेही तथ्य आढळून आले नाही, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले आहे.

बुधवारी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील सहदेव नगर येथील दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळेसारखा दिसणारा एक तरुण आपल्या मित्रासह बाईकवरून फिरत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून सीसीटीव्हीमध्येही दोन संशयित तरुण फिरताना दिसत होते. यातील एक कृष्णा आंधळे असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु यामध्ये तथ्य नसल्याचे आता पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री