वाल्मिक कराड (संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्याप्रकरण : वाल्मीक कराडला जामीन नाकारला

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने बुधवारी मोठा धक्का दिला. न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने बुधवारी मोठा धक्का दिला. न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

या प्रकरणातील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चुरशीची ठरली होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्यावतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि 'मकोका' अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्या. सुशील घोडेस्वार यांनी कराड याचा जामीन नाकारला.

बुधवारच्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयाला करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, "तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू. वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात १९ डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम आता लांबला आहे.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण