महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ फसवणूक; दाम्पत्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी

खटाव तालुक्यातील निमसोड, येथील प्रतीक्षा जाधव व तिचा पती गणेश घाडगे यांनी शासकीय यंत्रणेला आव्हान देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाल्याने वडूज पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Swapnil S

कराड : खटाव तालुक्यातील निमसोड, येथील प्रतीक्षा जाधव व तिचा पती गणेश घाडगे यांनी शासकीय यंत्रणेला आव्हान देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाल्याने वडूज पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

निमसोड, ता. खटाव येथील गणेश संजय घाडगे व प्रतीक्षा गणेश घाडगे (लग्नापूर्वीचे नाव प्रतीक्षा जाधव) या पती-पत्नीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ॲपचा गैरवापर करत शासनाकडून आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच झालेल्या अफरातफरीचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेला हादरून सोडणारा होता.

शासनाने याची गंभीर दखल घेत सखोल तपासाअंती वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वडूज पोलीस यंत्रणेने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत घाडगे दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

गुरुवारी दोघांना न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास वडूज पोलीस करत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी