प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची; 'एक राज्य, एक गणवेश' योजना

'एक राज्य, एक गणवेश' या मोफत गणवेश योजनेची २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : 'एक राज्य, एक गणवेश' या मोफत गणवेश योजनेची २०२५-२६ या नवीन शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गडद निळ्या रंगाचा स्कर्ट तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थीनींना सलवार-कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असणार आहे. विशेष म्हणजे एक राज्य एक गणवेश' या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असणार आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येत आहे.

समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र शाळांतील इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासन निर्णय ८ जून २०२३, १८ ऑक्टोंबर २०२३ व १० जून २०२४ अन्वये देण्यात आल्या आहेत.

केंद्रीकृत पद्धतीमधील अडचणींवर तोडगा

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पध्दतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी त्यानुषंगाने लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पध्दतीने देण्यात यावा, अशी मागणी केली होती. यानुसार मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन