महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो धडकल्यानं एकाचा मृत्यू

एका उभ्या असलेल्या ट्रकला एक पिकअप बोलेरो पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला आहे.

नवशक्ती Web Desk

समृद्धी महामार्ग आणि अपघात हे जणू समिकरणच झालं आहे. या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण असचं झालं आहे. या महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. एका उभ्या असलेल्या ट्रकला एक पिकअप बोलेरो पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला आहे.

सिन्नरहून नागपूरकडे जाणारा एक ट्रक पाठीमागील भाग तुटल्यामुळे समृद्धी महामार्गावरील दुधणवाडी गावाजवळ 80 किलोमीटरच्या लेनवर उभा होता. यावेळी मुंबईहून येलदरीकडे जाणारी पिकअप बोलेरोने पाठीमागून येत उभ्या असलेल्या ट्रकला जोराने धडक दिली. यात गाडीचा चालक मोहम्मद शाहरुख आणि शाहिद हुसेन हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांच्या सोबत असलेला अब्दुल कादिर मोहम्मद खलील शेख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात इतका भीषण होता की यात बोलेरो गाडीचा अक्षरश: चेंदा मेंदा झाला. या गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तसंच मृत अब्दूल याला पिकअप कापून बाहेर काढाव लागलं. यावेळी रुग्णवाहिकेवरील डॉक्टर मोरे यांनी त्याला मयत घोषित केलं. या अपघातानं समृद्धी महामार्गावरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले