महाराष्ट्र

नांदेड : पुरूषांना घरी बोलावून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; 'सेक्स एक्स्टाॅर्शन' करून खंडणी वसूल करणारी टोळी गजाआड

Swapnil S

नांदेड : पुरुषांना घरी बोलावुन त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी वसुल करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. यात तीन पुरुषांसह दोन महिलांचा समावेश आहे.

नांदेडमध्ये एका २१ वर्षीय तरूण सेक्स एक्स्टाॅर्शनच्या विळख्यात सापडला होता. त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना गुन्‍हा उघडकीस करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्‍हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी टीम तयार केली. आरोपींचा शोध घेत असताना त्यांना भाग्यनगर ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी हे पुणे येथे पळून जाण्याचे तयारीत आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी शिताफीने संशयित आरोपी विशाल हरिश कोटियन (३३), नितीन दिनेश गायकवाड (२८), सुनील ग्यानोबा वाघमारे (३४), नीता नितीन जोशी (२७) व राधिका रूपेश साखरे (२५) (हे सर्वजण व्यवसायाने मजुरी करत असून, नांदेडमधील रहिवासी) या पाच जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी नांदेडमधील कॅनॉल रोडवरील प्रकाशनगर येथे भाड्याने खोली घेतली होती. खोलीमध्ये महिलांच्या मदतीने पुरुषांना बोलावून त्यांना बळजबरीने निर्वस्त्र करून, त्यांचा व्हिडीओ बनवून, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पुरुषांना वारंवार मोठ्या रक्कमेची मागणी करीत होते, असे तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यातील आरोपींना पुढील तपासकामी भाग्यनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना कोणासोबत घडल्या असतील, अथवा अशा प्रकारची पैशाची मागणी कोणी करीत असेल तर त्यांनी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस