संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

ते आमच्या विचारांचे नाहीत! राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास शरद पवारांचा नकार

उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’ आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.

Swapnil S

मुंबई : उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’ आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांचा मला गुरुवारी फोन आला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्याबाबत मी त्यांना म्हणालो की, आमच्या बैठका झाल्या आणि ‘इंडिया’ आघाडीने बी. सुदर्शन यांचा फॉर्मही भरला. तसेच राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत.

शरद पवार म्हणाले की, 'एनडीएकडे मतांची संख्या जास्त आहे, पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. आमच्याकडे मतांची संख्या कमी आहे, मात्र आम्हाला चिंता नाही. राधाकृष्णन राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. आम्ही सरकारचा विचार करत नाही तर निवडणूक आयोगाचा विचार करतो. निवडणूक आयोगाकडून आम्हाला फार काही अपेक्षा नाही. बिहार राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या आठवड्यात ३०० खासदार रस्त्यावर उतरले तेव्हा आम्हाला अटक केली, असे पवार म्हणाले.

फडणवीस यांनी पाठिंबा देण्यासाठी केले होते आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले की, 'मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला होता. मी त्यांना आवाहन केले की, महाराष्ट्राचे राज्यपाल जे मुंबईचे मतदार आहेत त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही एक प्रकारची पक्षविरहीत असल्याचे मानली जाते. तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी माणसे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला एक मतदार जर देशाचा उपराष्ट्रपती बनत असेल तर तुम्ही त्यांना समर्थन द्या.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ, तर शरद पवारांनी सांगितले की सर्व विरोधक एकत्र येऊन जर उमेदवार उभा करीत असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत गेले पाहिजे.

निवडणुकीच्या निकालाचा पक्षाकडून अभ्यास सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस मागील निवडणुकांचे निकाल निवडणूक अभ्यासत असून मतांचे (मतचोरीचे) प्रकरण देशातील जनतेसमोर आम्ही मांडणार आहोत. याबाबतचा ठोस आराखडा तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतील. आम्हाला निवडणूक आयोगाकडून काहीही अपेक्षा नाही, असे पवार म्हणाले.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदार ED च्या रडारवर! के.सी. वीरेंद्र सिक्कीममधून अटकेत; गोव्यात पाच कॅसिनो अन् कोट्यवधी रुपयांची उलाढाल

धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी CBI चा छापा; १७ हजार कोटींच्या बँक फसवणुकीची चौकशी

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय