महाराष्ट्र

शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल विरोधात लागण्याची शक्यता

शिवसेनेचा जसा निकाल लागला तसाच काहीसा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीतही लागण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कुणाची, हा निकाल लागण्याआधीच शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Swapnil S

पुणे : सध्या विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असून, येत्या १५ दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याविषयी निकाल सुनावणार आहेत. शिवसेनेचा जसा निकाल लागला तसाच काहीसा निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीतही लागण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कुणाची, हा निकाल लागण्याआधीच शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून राष्ट्रवादी आमची हा दावा करण्यात आला, तर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेण्याचे आदेश दिले. शिवसेनेच्या बाबतीत निकाल देताना, विधानसभा अध्यक्षांनी ‘खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे’, असा निर्णय दिला. तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय अजित पवारांच्या बाजूने लावणार आहेत, असे राजकीय भाकीत केले जात आहे. त्यामुळे शरद पवारांनी दुसऱ्या चिन्हाबाबत चाचपणी सुरू केली आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश राहुल नार्वेकरांना दिले आहेत. राष्ट्रवादीच्या याचिकेसंदर्भात मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला आहे. आता १५ फेब्रुवारीच्या आत राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी अंतिम निर्णय जारी केला जाईल,' अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत