शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची सुनावणी आता १८ फेब्रुवारीपासून; सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख' सुरूच  
महाराष्ट्र

शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची सुनावणी आता १८ फेब्रुवारीपासून; सर्वोच्च न्यायालयात 'तारीख पे तारीख' सुरूच

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरच ही सुनावणी होणार आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या चिन्हांबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची ‘तारीख पे तारीख’ सुरूच असून पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरच ही सुनावणी होणार आहे.

आता येत्या १८ फेब्रुवारीपासून याबाबत दैनंदिन सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात १८ फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तरपणे ऐकून घेतला जाणार असून, त्यानंतर या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा निकाल आता फेब्रुवारी महिन्यात तरी लागणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

बोईंगच्या ७८७ च्या इलेक्ट्रिक रचनेचे सखोल मूल्यमापन करा; वैमानिक संघटनेची मागणी

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश