पुणे / प्रतिनिधी
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची शिवानी अगरवालला गुन्हे शाखेने अटक केली. ससूनमधील रक्तनमुने फेरफार प्रकरणात अगरवालची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात तिचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाला. त्यानंतर पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. त्यावेळी ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलासह चौघेजण उपस्थित होते. याप्रकरणी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली. तपासात मिळालेली माहिती, तसेच रक्तनमुने बदलणे प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणात तिचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अपघात प्रकरणात मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात घेण्यात आलेले रक्तनमुने डॉक्टरांनी फेकून दिल्याचे उघडकीस आले होते. तपासणीसाठी दिलेले रक्तनमुने एका महिलेचे असल्याचे उघडकीस आले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात रक्तनमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणात मुलाला वाचविण्यासाठी ससून रूग्णालयातल डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी रक्तनमुने घेताना विशेष खबरदारी घेतली होती. त्यावेळी ससूनमध्ये एका महिलेला बोलाविण्यात आले होते. महिलेचे रक्तनमुने न्यायवैद्यक शास्त्र विभागात (फॉरेन्सिक डिपार्टमेंट) घेण्यात आले नव्हते. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने कोणताही पुरावा राहणार नाही, याची काळजी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांनी घेतली होती.
दहाजण अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आली असून, अगरवाल कुटुंबातील विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, वडील सुरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.
मुलाला वाचविण्यासाठी...
रक्तनमुने बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल तयार केला. चौकशी अहवालातून महत्वाची माहिती उघडकीस आली आहे. चाचणीसाठी पाठविण्यात आलेले रक्तनमुने एका महिलेचे होते. रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या विलांच्या रक्तनमुन्याशी जुळले नव्हते. त्यांचा डीएनए जुळला नसल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी चौकशीसाठी शिवानी अगरवालला ताब्यात घेतले. मुलाला वाचविण्यासाठी तिने स्वतःचे रक्त दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.