एक्स @AjitPawarSpeaks
महाराष्ट्र

ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीत दाखल

महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

Swapnil S

रायगड : महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. नुकतीच त्यांनी महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

“राष्ट्रवादी आमच्यासाठी कुटुंबासारखा आहे. अजितदादांच्या नेतृत्वात हा पक्ष अतिशय चांगले काम करत आहे. मला आपल्या कुटुंबात परत आल्याचा खूप आनंद आहे,” असे स्नेहल जगताप यांनी पक्ष प्रवेशादरम्यान सांगितले.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी