महाराष्ट्र

राज्यातील जमिनी विकून पैसे आणू का? विकासनिधीवरून पवार, महाजन यांच्यात खडाजंगी

Swapnil S

मुंबई : विकासनिधीच्या वाटपावरून मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या दोन दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धामुळे कॅबिनेटमधील अन्य सदस्यही अचंबित झाले. आपल्या ग्रामविकास खात्यासाठी अधिक निधी देण्यात यावा, अशी मागणी महाजन यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी आता पैसे कुठून आणू. राज्यातील जमिनी विकून पैसे आणू का?, अशा शब्दांत अजित पवार यांनी महाजन यांना सुनावले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली.

यानंतर गिरीश महाजन यांनीही अजित पवारांना जशास तसे उत्तर दिले. अजित पवार यांच्या पक्षातील एका आमदाराच्या नाशिकमधील सिन्नर येथील मतदारसंघात एका स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या तरतुदीचा मुद्दा महाजन यांनी मांडला. पैसे नाहीत म्हणून नको तिथे खर्च करायला नको, ही तुमची (अजित पवार) भूमिका असेल तर या स्मारकासाठी कोट्यवधींचा खर्च कशाला? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळे एकीकडे कोंडीत सापडलेल्या अजित पवार यांना आणखीन घेरण्याचा प्रयत्न महाजन यांनी केला. त्यामुळे हा वाद मंत्रिमंडळ बैठकीत चांगलाच रंगला.

महायुतीत आलबेल नसल्याचे संकेत

गिरीश महाजन व अजित पवार यांच्यातील या वादावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र उघड झाले आहे. यापूर्वीही विकासनिधीवरून महायुतीत असलेली खदखद उफाळून आली होती. बच्चू कडू यांनी याआधी आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था